Please wait...


About Us (आमच्याबद्दल माहिती)

जगतज्योती, विश्वगुरू महात्मा बसवन्ना हे खऱ्या अर्थाने समतानायक होते. सर्व स्तरावरील सामाजिक समतोल साधण्यासाठी त्यांनी दिशा दिली. स्त्री पुरुष समानता आणि जातीय भेद मिटवण्यासाठी नंतरच्या कालखंडात झालेले भरीव कार्य सर्वश्रुत आहे. समाजातील आर्थिक विषमता दुर होण्यासाठी त्यांनी "काय कवे कैलास "(work is worship)हा मंत्र दिला .याच सिद्धांतातील' कायक' आणि 'दासोह' या सवृत्तीचा आधार घेऊन आम्ही ' कायक सन्मान' ही संकल्पना आपणासमोर आणली आहे.
सत्य ,शुद्ध व नित्य समाज उपयोगी कर्म करणे म्हणजे 'कायक'.
प्रत्येक व्यक्तीची सामाजिक बांधिलकी व उत्तरदायित्व याचे प्रकट /अप्रकट स्वरूप म्हणजेच 'दासोह'.
श्रमाची पूजा ही शिवपूजा आणि श्रमिक हाच सद्गुरु -तर दासोह ही प्रार्थना/ तीर्थयात्रा आहे.
आपण आपला कायक करणे -हीच समाजसेवा आहे. प्रत्येकाचे कायक वेगवेगळे असल्याकारणाने समाजाच्या नानाविध व संपूर्ण गरजांची पूर्तता होते -म्हणूनच सर्व कार्य करणारे एका समान पातळीवर. त्यांच्यात उच्च नीच असा भेद नाही. कायकातून स्वाभिमान ,स्वावलंबन, सुख-समृद्धी व संपत्तीची प्राप्ती होते.
कायक म्हणजे उत्पादन आणि दासोह म्हणजे त्याचे योग्य वितरण करणे आहे .कायक आणि दासोह या या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दासोह म्हणजे दान नव्हे तर ते उत्तरदायित्व आहे. दासोह तत्वात अर्थशास्त्र नीतिशास्त्र व समाजशास्त्र अंतर्भूत आहे.
एका स्वाभिमानी कायकाने स्वतःच्या दैनंदिन गरजांची ची पूर्तता करताना दुसऱ्या कायका चे दमन होणार नाही - याची काळजी /दक्षता बाळगली, सामाजिक आर्थिक समतोल अबाधित ठेवण्याकरता दुसऱ्या कायकाच्या स्वावलंबनाचा स्वीकार केला तर - हाच स्वतःला समाधान व इतरांना सन्मान मिळवून देणारा 'दासोह 'असेल. किमान अनुदान विरहित/रेशन विरहित सन्मानपूर्वक आयुष्य जगण्याचा स्वाभिमान सर्वाना मिळावा. विस्मरणात चाललेल्या ह्या दासोह तत्वाची नव्याने ओळख करून देऊन कायकास प्रोत्साहन मिळवून देणे- हेच कायक सन्मान या संकल्पनेचे ध्येय आणि उद्दिष्ट आहे .
लातूर शहर व त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या दहा किलोमीटर त्या परिघामधील सर्व कायकाची त्यांच्या कायका सह माहिती एकत्रित/ संकलित करून त्याचे उत्पादक, विक्रेता व सेवा व्यवसाय देणारे असे वर्गीकरण करण्यात येणार आहे. ज्याची जशी गरज तशी त्याला इतर योग्य कायकाची माहिती वेबसाईट/ मोबाईल ॲपच्या माध्यमाने त्वरित मिळेल. जो देतो तो काहीतरी घेतो आणि जो घेतो तो काही तरी देतो- यामुळे दोघेही ही समान पातळीवर एकमेकांचा सन्मान करतात आणि सामाजिक समन्वय व समरसता निर्माण करतात.
ह्या वेबसाईट मुळे नवतरुणांना नवीन कायक निर्माण करण्यासाठी प्रेरणा मिळेल. लघु /मध्यम उद्योग शिबिरे ,गृह उद्योग /कुटिर उद्योग यांचे प्रदर्शन तसेच सेवा व्यवसाय पुरवणाऱ्या कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे शिक्षण वर्ग घेणे हे कायक सन्मान साठी पुढचे पाऊल असेल. भविष्यामध्ये लवकरच वस्तूवरुन निर्माता अथवा यांची माहिती (Search By Product) तसेच छोट्या जाहिरातींचाही यामध्ये समावेश करण्यात येईल. लिंगायत धर्माचे धर्मसंस्थापक महात्मा बसवन्ना यांच्या विचारांवर आधारित हा उपक्रम आहे. फक्त लिंगायत धर्मासाठी नव्हे हे तर सर्वधर्म समावेशक अशी ही संकल्पना आहे. इतर जाती धर्माचे कायक यात नोंदणी करू शकतात .
!!जय बसवन्ना!!


अधिक माहितीसाठी संपर्क
विवेक जानते 9822187703
अॅड. पंकज कोरे 9975520781
प्रा.डॉ.सौ.उमिॅला धाराशिवे 9422469345
मार्गदर्शक
श्री चंद्रकांतअण्णा बिराजदार
श्री गुरुनाथजी मगे
श्री उमाकांतप्पा कोरे
प्रा उमाकांत होनराव
सल्लागार
श्री उदयजी चौडे
श्री नितीन शेटे
श्री धनराज हलकुडे
श्री संतोषप्पा हत्ते
श्री नागेश कनडे

सहकार्य
रुपेश पाटील
महेश कोळ्ळे
शिवा गुजर
योगेश होनमाळे


व समस्त वीरशैव लिंगायत समाज बांधव पदाधिकारी..


टीप: दारू, मांस, तंबाखू, अमली पदार्थ, लॉटरी, जुगार, शेअर ट्रेडिंग, कमोडिटी ट्रेडिंग यामध्ये कार्य करणार्‍यांचा यामध्ये समावेश असणार नाही.

© Copyright 2020, All rights reserved. Developed By ULPAT Solution